
जर्मनीतील म्युनिक शहरातील एक अजब घटना समोर आली आहे. कब्रस्थानातील जवळपास 1 हजार थडग्यांवर आणि लाकडांच्या क्रॉसवर क्यूआर कोडचे स्टिकल लावलेले आढळले आहेत. या स्टिकर्सवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मृत व्यक्तीची संपूर्ण माहिती मोबाईलमध्ये मिळत आहे. उदा. मृत व्यक्तीचे नाव, थडग्याचे लोकेशन यासह अन्य माहिती उपलब्ध होत आहे.
कब्रस्थानात दफन करण्यात आलेल्या मृत व्यक्तीची माहिती मोबाईलवर मिळत असल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु, हे क्यूआर कोड नेमके कशासाठी लावले आणि कोणी लावले यासंबंधी अद्याप माहिती समोर आली नाही. म्युनिकच्या तीन कब्रस्तानात वाल्डफ्रीडहोफ, सेंडलिंगर फ्रीडहोफ आणि फ्रीडहोम सोल्नमध्ये जवळपास 1 हजार क्युआर कोड आढळून आले आहेत. हे स्टिकर्स दोन्ही जुन्या आणि नव्या कबरीवर मिळाली आहेत. काही ठिकाणी केवळ लाकडाचे क्रॉस होते. कब्रस्तानमधील थडग्यावर क्यूआर कोडचे स्टिकर्स चिपकवणे हे कायद्याचे उल्लंघन असून गुन्हा आहे.