शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संकल्पना असलेला आणि मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड रविवारपासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी-वांद्रे सेतूला जोडणाऱया पुलाचे लोकार्पण केले जाणार असून तीन आंतरमार्गिकाही खुल्या केल्या जाणार आहेत.