
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चित्रपटांपेक्षा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आता आंध्र प्रदेशच्या थ्री टाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर राम गोपाल वर्मा यांनी हिंदूविरोधी टिप्पण्या केल्या, ज्यामुळे हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रजा काँग्रेसचे अध्यक्ष आणि उच्च न्यायालयाचे वकील मेदा श्रीनिवास यांनी वर्मांविरोधात थ्री टाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच पुरावा म्हणून वर्मा यांच्या सोशल मीडिया पोस्टची व्हिडिओ क्लिप आणि स्क्रीन शॉट सादर केले आहेत.