अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल

‘पुष्पा 2’ चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुन सध्या प्रमोशनसाठी व्यस्त असताना त्याच्याविरोधात हैदराबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रमोशनवेळी चाहत्यांचे प्रेम पाहून अल्लू अर्जुन म्हणाला, मी माझ्या चाहत्यांवर फार प्रेम करतो. माझ्याकडे चाहते नाही तर एक आर्मी आहे, ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत. अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांसाठी ‘आर्मी’ हा शब्द वापरला आहे हे चुकीचे आहे, असे म्हणत श्रीनिवास गौड यांनी तक्रार दाखल केली.