जगभरात अनेक कंपन्या Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर जे कर्मचारी Gen Z आहेत त्यांना कामावरून काढून टाकत आहेत. या पिढीच्या तरुण तरुणींमध्ये प्रोफेशनलिझ्म नाही असे कारण कंपन्यांनी दिले आहे.
Gen Z बाबत एक सर्वेक्षण केले गेले. त्यात एक गोष्ट समोर आली की अनेक मोठ्या कंपन्या Gen Z तरुण तरुणींना कामावर घेत नाहीत,तसेच आहे त्या Gen Z कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. या कर्मचाऱ्यांची कम्युनिकेशन स्किल चांगले नाही, तसेच कामाच्या बाबतीत या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असतो असेही काहींनी म्हटले आहे.
Intelegent.com या साईटने 10 मोठ्या कंपन्यांशी चर्चा केली. त्यात 10 पैकी सात कंपन्यांनी सांगितले की नुकतंच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या तरुणांना नोकरी देण्याबाबत कंपनी दहा वेळा विचार करते. या सर्वेक्षणात एक हजार कपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंवला होता. न्युजवीकने याबाबत एक अहवाल सादर केला होता.
कॉलेजमध्ये जे शिकवले गेले आणि प्रत्यक्षात करावे लागणारे काम यात तफावत असतो, त्यामुळे या पिढीच्या तरुण तरुणींना काम करताना अडचणी येतात. या पिढीतल्या तरुणांना कामावर घेण्यासाठी कंपन्या कचरतात कारण हे तरुणी ऑफिसच्या वातावरणत फिट बसत नाहीत. इतकंच नाही तर कामाची जबाबादारी घेण्यात हे तरुण कमी पडतात.
या तरुणांना कॉलेजमधून थेअरॉटिकल नॉलेज तर मिळतं. पण व्यावहारिक ज्ञान, वास्तवातला फरक आणि प्रोफेशनलिझम कमी पडतो. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 75 टक्के कंपन्यांनी म्हटले की नुकतंच कॉलेजमधून पासआऊट झालेल्या तरुणांचे काम समाधानकारक नाही. या तरुणांमध्ये कामासाठी प्रेरणा नसते. तसेच 39 कंपन्यांना वाटले की या पिढीमध्ये कम्युनिकेशन स्किल्सही कमी आहेत. तर 46 टक्के कंपन्यांनी या पिढीत प्रोफेललिझम कमी असल्याचे म्हटले आहे.