
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 ही मार्गिका पूर्णतः भूमिगत असून ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले. मात्र चार महिने उलटल्यानंतरही या मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. भुयारी मेट्रोने आतापर्यंत केवळ 27 लाख मुंबईकरांनी प्रवास केला आहे. या मार्गिकेवर रोज 4 लाख लोक प्रवास करु शकतात. मात्र, सध्या रोज सरासरी केवळ 20 हजार मुंबईकर प्रवास करत आहेत.