
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल. याप्रकरणी चौकशीसाठी आता समिती नेमण्यात आली. दरम्यान यपरकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले आहेत की, “ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असवेंदनशिलतेचा परिचय या घटनेतून आपल्याला पाहायला मिळतो.”
याप्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष्य पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त असतील. त्यांच्यासह मंत्रालयाच्या उपसचिव यमुना जाधव, सहकक्ष प्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, अधिक्षक, सर ज.जी. रुग्णालय समूह, मंत्रालयातील उप सचिव / अवर सचिव, विधि व न्याय विभागाचे सदस्य या समितीत असणार आहेत.