
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 6 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता 1,803 रुपये मोजावे लागतील. तेल विपणन कंपन्यांनी नुकताच देशातील सर्व शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,797 रुपयांवरून 1,803 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत. नव्या दरानुसार मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,755 रुपये झाली आहे, तर कोलकात्यात 1,913 आणि चेन्नईत 1,965 रुपये असणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे याचा छोटय़ामोठय़ा व्यावसायिकांना फटका बसणार आहे.