12, 13 एप्रिलला बीकेसीत कॉमिक कॉन

देशभरात साजऱ्या झालेल्या थरारक सीझननंतर ‘कॉमिक कॉन इंडिया’ आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा आणि बहुप्रतीक्षित एडिशनसाठी सज्ज आहे. हा कार्यक्रम 12 आणि 13 एप्रिल रोजी बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘कॉमिक कॉन’ चाहत्यांना जगभरातील त्यांच्या आवडत्या कॉमिक क्रिएटर्सना भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देईल. त्यामध्ये ‘कोनान द बार्बेरियन’चे प्रसिद्ध लेखक तसेच मार्वल, डीसी, डिने आणि पॅपकॉमसाठी लक्षणीय काम केलेले जिम झब तसेच रॉब डेनब्लायकर-जगभरात नावाजले गेलेले सायनाइड आणि हॅपीनेस फ्रँचाईझीचे को-क्रिएटर आघाडीवर आहेत. त्याशिवाय देशातील प्रसिद्ध कॉमिक बुक क्रिएटर्सही हजेरी लावणार आहेत. ग्रॅण्ड फिनालेमध्ये पॉप कल्चरचा अनोखा अनुभव मिळणार असून त्यात आंतरराष्ट्रीय आणि हिंदुस्थानी कॉमिक क्रिएटर्स, खास परफॉर्मन्स, कॉमिक्स, गेमिंग व अनेमेचं खास विश्व यांचा समावेश असेल.