एअर इंडियाचा रामभरोसे कारभार, 50 हजार घेऊनही तुटलेल्या सीटवर बसवले, कॉमेडियन वीर दासचा आरोप

तब्बल 50 हजार रुपये देऊनही एअर इंडियाने तुटलेल्या सीटवर बसवले, असा आरोप अभिनेता वीर दासने केला. 50 हजार रुपयांची तिकिटे बुक केली होती, ज्यात व्हीलचेअर आणि सामान वाहून नेण्याची सुविधादेखील होती. कारण त्याच्या पत्नीच्या पायाला फ्रॅक्चर आहे, पण ही व्हीआयपी सुविधा मिळणे तर दूरच, त्याला सीट तुटलेल्या अवस्थेत आढळली आणि तिचे फूट रेस्टही तुटलेले होते. वीर दास म्हणाला की, जेव्हा त्याने तक्रार केली तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. वीर दासने त्याच्या एक्स अकाऊंटवरून संताप व्यक्त केला आहे. ‘आम्ही दोन तास उशिराने दिल्लीला पोहोचलो आणि आम्हाला सांगण्यात आले की, विमानातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मी व्हीलचेअर आणि लाऊंज आधीच बुक केलेले होते. मी 4 बॅगा घेऊन जात असताना एअर होस्टेसला माझ्या पत्नीला मदत करण्यास सांगितले. ती गप्प आणि क्लूलेस होती, असे तो म्हणाला.

बिझनेस क्लासच्या सीटवर झोपले केबिन क्रू

अन्य एका घटनेत शिकागोहून दिल्लीला जाणाऱया एअर इंडियाच्या विमानातील महिला प्रवाशाने तिला प्रवासात वाईट अनुभव आल्याचे सांगितले. तांत्रिक बिघाडाचे कारण देत केबिन क्रूने महिलेला बिझनेस क्लासची सीट रिकामी करण्यास सांगितले. काही तासांनंतर तेच क्रू मेंबर्स रिकाम्या बिझनेस क्लासच्या रांगेत झोपलेले आढळले, असा आरोप महिलेने केला आहे.