कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता, पत्नीची सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव

शो साठी मुंबईबाहेर गेलेला कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक तासांपासून सुनीलचा पत्नीशी काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. अखेर पत्नीने सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठत पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

शो निमित्त मुंबईबाहेर गेलेले सुनील पाल आज मुंबईत आपल्या घरी परतणार होते. मात्र ते परतलेच नाही. पत्नीने वारंवार मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तास उलटून गेले तरी अद्याप पत्नीचा सुनीलशी संपर्क झाला नाही. अखेर पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सुनील पाल यांनी अनेक कॉमेडी शो सादर करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. याशिवाय पाल यांनी चित्रपटातही काम केले आहे. फिर हेरा फेरी’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘किक’ यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.