कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. एका शोसाठी सुनील पाल हे गेले होते. गेल्या अनेक तासांपासून ते बेपत्ता आहेत अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

‘सुनील आज घरी येणे अपेक्षित होते, मात्र ते घरी आलेले नाहीत. त्यांचा फोन स्विच ऑफ लागत आहे. अनेक तासांपासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे सुनील बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आले आहे,’ असे सुनील पाल यांच्या पत्नीने म्हटले आहे.