कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव, गुन्हे रद्द करण्याची मागणी

कुणाल कामरावर मुंबई पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. आता कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात कामराने न्यायालयात आव्हान दिले आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केलं होतं. त्यामुळे दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कामराविरोधात गुन्हे दाखल केले होते.

उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी कामराने मुंबई पोलिसांना पत्र लिहिले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर होण्याची परवानगी मागितली होती. खार पोलिसांकडून कामराला तीन वेळा समन्स जारी केले होते. कामराने एकदाही पोलिसांकडे हजेरी लावली नव्हती, त्यानंतर कामराने पत्र लिहून ही विनंती केली होती. 2 एप्रिल रोजी कामराला तिसरे समन्स जारी करण्यात आले होते. पाच एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले होते. कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा कोर्टाने कामराला कोर्टाने दिलासा दिला होता.