
स्टँडअप कॉमेडियन पुणाल कामराने गायलेले विडंबनात्मक ‘गद्दार’ गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबल्याने मिंध्यांकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. शिवाय चार गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्यात यावा अशी मागणी करत पुणाल कामरा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने उद्या मंगळवारी याचिकेवर तातडीने सुनावणी ठेवली आहे.
पुणाल कामराचे गद्दार गीत संपूर्ण देशात व्हायरल झाल्यामुळे मिंधे गट बिथरला आहे. पुणालविरोधात कारवाईसाठी मिंधेंकडून सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी चार गुन्हे दाखल केले असून त्याला एकापाठोपाठ एक समन्सदेखील बजावले आहेत. इतकेच नव्हे तर, मिंध्यांकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. मिंधे गटाकडून आपल्याला धमक्या येत असून जिवाला धोका असल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.