एका तरुणाचा जुगाड पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत. या तरुणाने बाईकवरच कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटले आहे. या बाईकच्या पुढयात एक एटीएम मशीन बसवले आहे. या मशीनमध्ये डेबिट कार्ड टाकल्यानंतर हेडलाईटचे बटन दाबल्यानंतर त्यानंतर कोल्ड्रिंक्सचा ग्लास भरला जातो. तरुणाचा हा जुगाड पाहून अनेकांनी सोशल मीडियावर तरुणाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, इतकी बुद्धी येते कुठून, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, हिंदुस्थानात एकापेक्षा एक भारी जण आहेत. ही कोणत्या टाईपची एटीएम मशी आहे. हे टॅलेंट हिंदुस्थानातून बाहेर जायला नाही पाहिजे, अशा शब्दांत यूजर्संनी या तरुणाचे कौतुक केले आहे.