
उन्हाळ्यात घाम आणि तीव्र सूर्यप्रकाशाचा आपल्या त्वचेवर थेट परिणाम होतो. यामुळे त्वचा निस्तेज होते. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर, त्वचेशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू शकतात. यामध्ये उन्हामुळे होणारे पुरळ, घामामुळे येणाऱ्या फोड्या, त्वचेला खाज सुटणे या समस्यांना सामोरं जावं लागतं. उन्हाळ्यात अनेकजण त्वचेवर नारळाचे तेल देखील लावतात. प्रश्न असा आहे की, उन्हाळ्यात चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणे खरोखर सुरक्षित आहे का? हेच आपण जाणुन घेऊया.
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या शरीराला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. काही कारणास्तव आपण पुरेसे पाणी घेतले नाही तर त्याचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. त्वचेचे हायड्रेशन कमी असल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. याचा अर्थ असा की त्वचेला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. त्याच वेळी, तज्ज्ञांच्या मते, नारळाच्या तेलाच्या मदतीने त्वचेला हायड्रेट ठेवता येते. खरंतर, नारळाच्या तेलात असे संयुगे असतात जे त्वचेतील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवू शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही उन्हाळ्यात चेहऱ्यावर नारळाचे तेल वापरू शकता. ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात त्वचेवर खोबरेल तेल लावण्याचे फायदेउन्हाळ्यात त्वचेला खोबरेल तेल लावल्याने, जळजळ किंवा खाज सुटण्याची समस्या देखील दूर होते. परिणामी, त्वचा मऊ आणि आरामदायी होते.
उन्हात बाहेर पडल्याने त्वचेला खूप घाम येतो. यामुळे त्वचेवर लालसरपणा तर येतोच, शिवाय पुरळ उठण्याचा धोकाही वाढतो. खोबरेल तेल लावून उन्हात बाहेर पडल्यावर पुरळ, खाज सुटणे ही समस्या दूर होऊ शकते.
उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावावे असा सल्ला तज्ज्ञ देतात. विशेषतः, SPF 30 असलेले सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. सनस्क्रीनऐवजी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्यानंतरही घराबाहेर जाऊ शकता.
उन्हाळ्यात घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामध्ये मुरुमे, पुरळ इत्यादींचाही समावेश आहे. खोबरेल तेलाच्या मदतीने केवळ त्वचेवरील पुरळच नाही तर मुरुमांच्या समस्येपासूनही मुक्तता मिळवता येते.
खोबरेल तेल हे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्याच्या मदतीने कोलेजन दुरुस्त होते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात आणि त्वचेची लवचिकता सुधारते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)