अमेरिकेच्या कोको गॉफ हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकविजेत्या चीनच्या झेंग किनवेन हिचा पराभव करीत डब्लूटीए फायनल्सचा किताब जिंकत इतिहास घडविला. तिने कारकिर्दीत प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हे विशेष! कोको गॉफने विजेतेपदाच्या लढतीत जबरदस्त पुनरागमन करताना झेंग किनवेन हिचा 3-6, 6-4, 7-6 असा पराभव करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजेतेपदाबद्दल तिला 40.54 कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तृतीय मानांकित गॉफने अव्वल मानांकित आर्यना सबालेंका हिचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे 22 वर्षीय झेंग हिनेही विम्बल्डन चॅम्पियन बारबरा क्राजीकोवा हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कोका गॉफ ही 21 वर्षांहून कमी वयात ही स्पर्धा जिंकणारी चौथी अमेरिकन महिला टेनिसपटू ठरली. तिच्या आधी, क्रिस एवर्ट ट्रेसी ऑस्टिन व सेरेना विल्यम्स यांनी हा पराक्रम केलेला आहे.