
दिल्लीत रविवारी कोचिंग सेंटरच्या तळघरात पुराचे पाणी साचून तीन यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आता आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अटक केलेल्या आरोपींची संख्या 7 वर पोहोचली आहे. पाच आरोपींमध्ये त्या व्यक्तीचाही समावेश आहे, ज्याने भरधाव वेगाने कार पाण्यातून बाहेर काढली. त्याच वाहनामुळे कोचिंग सेंटरचे गेट तोडून जोरदार लाट आली आणि तळघरात पाणी वेगाने भरू लागले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या पश्चिम विभागातील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात रविवारी पुराचं पाणी अचानक शिरल्याने चार तासांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील अन्य पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, आतापर्यंत या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे, यामध्ये त्या कोचिंग सेंटरच्या मालकासह गाडी चालकाचाही समावेश आहे. ज्याने त्या पाण्यातून गाडी चालवली. ज्यानंतर त्याच वाहनामुळे कोचिंग सेंटरचे गेट तोडून जोरदार लाट आली आणि तळघरात पाणी वेगाने भरू लागले. आता पोलीस दिल्ली महानगरपालिकेलाही (एमसीडी) नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये पोलीसांनी एमसीडीला तपासात सामील होण्यासाठी सांगण्यात आली आहे. तिथे एमसीडीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटरच्या विरोधाच कारवाई सुरु केली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एक उच्चस्तरिय समिती स्थापन करण्यात आली येणार आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत रविवारी माहिती दिली.
13 कोचिंग सेंटर्स सील
दिल्ली सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुने राजेंद्र नगर परिसरातील अनेक बेकायदेशीरपणे कार्यरत कोचिंग सेंटर्सच्या तळघरांना सील करण्यासाठी महापालिकेचे एक पथक रविवारी दाखल झाले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत 13 कोचिंग सेंटर्स सील करण्यात आले आहेत. यामध्ये आयएएस गुरुकुल, चहल अकादमी, प्लुटस अकादमी, साई ट्रेडिंग, आयएएस सेतू, टॉपर्स अकादमी, दैनिक संवाद, सिव्हिल डेली आयएएस, करिअर पॉवर, 99 नोट्स, विद्या गुरू, गाइडेंस आयएएस आणि ‘इझी फॉर आयएएस’ यांचा समावेश आहे.