
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आणि सीमा शुल्क विभागाने ड्रग तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. त्या दोघांच्या शरीरातून 15 कोटींचे कोकेन जप्त केले. युगांडाच्या एन्टेबे येथून एक प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला.
त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने शरीरात कोकेन असलेल्या कॅप्सूल लपवल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून केले. त्याच्या शरीरातून 84 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या.