उमेदवार आणि नेत्यांचे सहकुटुंब मतदान

विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी राज्यभरात शांततेत मतदान पार पडले. विविध राजकीय पक्षांचे नेते व उमेदवारांनी सहकुटुंब सकाळीच मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदान केल्याची खूण असलेले बोट उंचावत सहकुटुंब सेल्फी काढला. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन नेतेमंडळी आणि उमेदवारांनी मतदारांना केले. त्यांच्या हजेरीवेळी मतदान केंद्रातील इतर कामकाजावर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ न देण्याची खबरदारी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी घेतली.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि विक्रोळी विधानसभेचे उमेदवार सुनील राऊत यांनी सहकुटुंब मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

बोरिवली विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय भोसले यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.

खासदार वर्षा गायकवाड यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. यावेळी धारावी विधानसभेच्या उमेदवार ज्योती गायकवाड व त्यांच्या मातोश्री.

संभाजीनगर येथील अजबनगर परिसरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

दहिसरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी सहकुटुंब मतदान केले.

शिवडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदान केले.

राघव पुराणिक हा तरुण कॅनडावरून खास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला होता.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

श्रद्धा पाटोळे हिने बोहल्यावर चढण्याआधी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.

मितुल कनानी यांनी पाय फ्रॅक्चर असतानाही दहिसर पूर्व विद्यामंदिर येथे मतदानाचा हक्क बजावला

दिंडोशीचे उमेदवार सुनील प्रभू यांनी मतदानाचा हक्क बजावला.

मागाठाणेचे उमेदवार उदेश पाटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांनी कुर्ला येथे मतदान केले.

कलिनाचे उमेदवार संजय पोतनीस यांनी वाकोला येथे मतदान केले.

जोगेश्वरीचे उमेदवार बाळा नर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

गोरेगावचे उमेदवार समीर देसाई यांनी मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी वरळी येथे मतदान केले.