आली रे आली सीएनजी बाईक आली… 1 रुपयात 1 किलोमीटर धावणार

पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून आता बाईक परवडत नसल्याचे चित्र आहे. इलेक्ट्रिक बाईक बाजारात आल्या; परंतु त्यांच्या किमती प्रचंड आहेत. त्यामुळे जर सीएनजीएवर चालणारी बाईक आली तर… असे अनेकदा मनात आले. आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. जगातील पहिली सीएनजी आणि पेट्रोलवर चालणारी बाईक बाजारात आली असून ही बाईक अवघ्या 1 रुपयात 1 किलोमीटरपर्यंत धावणार आहे.

बजाज प्रीडम 125 ही बाईक बाजारात दाखल झाली असून एक बटण दाबून ही बाईक सीएनजी आणि पेट्रोलमध्ये स्विच केली जाऊ शकणार आहे. या बाईकची किंमत 95 हजार ते 1.10 लाख दरम्यान आहे. बाईकचे बुकिंग सुरू झाले असून बाईकची डिलिव्हरी प्रथम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार आहे.

यात 2 लिटरची पेट्रोल टाकी आणि 2 किलोची सीएनजी टाकी आहे. या बाईकच्या तब्बल 11 हून अधिक सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 टन भरलेल्या ट्रकखाली आल्यानंतरही बाईकच्या सीएनजी टाकीचा स्पह्ट झाला नाही. दोन्ही इंधन एकत्र करून ही बाईक तब्बल 330 किलोमीटर धावेल असा दावाही पंपनीने केला आहे.

या बाईकमुळे प्रदूषण कमी होईल. 2025च्या पहिल्या तिमाहीत सीएनजी बाईक सर्वत्र उपलब्ध करून दिली जाईल. या बाईकमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 50 टक्क्यांची घट, कार्बन मोनोऑक्साईड उत्सर्जनात 75 टक्के घट, तर मिथेन हायड्रोकार्बन उत्सर्जनात सुमारे 90 टक्के घट होऊ शकेल. या बाईकमुळे पेट्रोल बाईकच्या तुलनेत कमी प्रदूषण होईल.

ही सीएनजी बाईक इतर 125 सीसी बाईकशी स्पर्धा करणार आहे. बाईकमध्ये व्हीलबेसवर पसरलेली एक लांब सीट आहे. सीटखाली सीएनजी टाकी देण्यात आली आहे.