योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत 3 वेळा आमनेसामने; पण भेट टळली; RSS-BJP मधील कलगितुरा सुरुच?

लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कलगितुरा सुरू झाला आहे. आरएसएसच्या मुखपत्रातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले होते. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाजप नेत्यांना उपदेशाचे कडू डोस पाजले होते. अर्थात त्यानंतर दोन्ही बाजुंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता शनिवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे घडलेल्या घटनेमुळे आरएसएस-भाजपामध्ये अद्यापही आलबेल नसल्याचे कयास लढवले जात आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शनिवारी तीन दिवसीय गोरखपूर दौऱ्यावर पोहोचले. येथे सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांच्या शिबिरात भाग घेण्यासाठी पोहोचले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला होता. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. दोन्ही नेत्यांमध्ये शनिवारी भेट होणे अपेक्षित होते. मात्र दुपारी दोनदा आणि सायंकाळी एकदा असे तीन वेळा ही भेट स्थगित करण्यात आली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अतिआत्मविश्वास नडला; संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी, RSS च्या कानपिचक्या

तीन वेळा आमनेसामने येऊनही भेट टाळण्यामागील नक्की कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे आरएसएसच्या सूत्रांनी ही भेट निश्चित नव्हती असे स्पष्टीकरण दिले आहे. सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांच्या शिबिरात भाग घेण्यासाठी बुधवारी गोरखपूरला पोहोचले असून रविवारपर्यंत येथे असणार आहे, असे आरएसएसच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काल टळलेली भेट आज होतेका याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अचानक RSS ने BJP वर हल्लाबोल का केला? खरं कारण आलं समोर!

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची कामगिरी साधारण राहिली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भाजपची खराब कामगिरी आणि उत्तर प्रदेशमधील आगामी रणनितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आता बोलून काय उपयोग, मोहन भागवत आणि RSS चं कोण ऐकतंय? काँग्रेसचा भीमटोला