मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी सगळे नियम धाब्यावर बसवून त्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात रात्री दहानंतरही प्रचार केला. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकावर नंतर सेना भार करत आचारसंहिता भंग केला. एकीकडे टिच्चून मुख्यमंत्र्यांनी प्रचार करत आचारसंहिता भंग केल्या. एकीकडे मूग गिळून का गप्प आहेत, उमेदवार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निवडणूक आयोग कारवाई करणार का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे. निवडणूक आयोग प्रचंड दबावाखाली असून विरोधकांना एक न्याय आणि मिंध्यांना एक न्याय कसा, असा सवालच दिघे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी या लिंकवर क्लीक करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात रविवारी रॅली काढली. वागळे इस्टेट येथील रामनगर आयटीआय सर्कल येथून दुपारी 3 वाजता रॅलीची सुरुवात होणारी होती. मात्र मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे उशिरा आल्याने रॅलीला 5 वाजता सुरुवात झाली. रात्री उशिरा ही रॅली कोपरी येथे पोहोचली, 10 नंतर प्रचार करण्यास बंदी असतानाही मुख्यमंत्र्यांना ‘आपली वेळ’ संपली असल्याचा पत्ताच लागला नाही. रात्री 10.30 वाजले तरी लवाजम्यासह एकनाथ शिंदेंची फटाक्याच्या जोरदार आतषबाजीत प्रचार रॅली सुरू होती. हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाच्या समोरच सुरू होता. आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून या रॅलीचे चित्र करताना कॅमेरे बंद दिसून आल्याने केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला.
मशाला पेटवा अन् दहशत संपवा
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदासंघाचा नाही स्वतःचा विकास केला असल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडणूक प्रचार करणाऱ्या आमच्या महिला पदाधिकारी, युवासैनिकांना फोनाफोनी सुरू असून धमकी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मतदारांनी येत्या 20 तारखेला मशाल पेटवा अन् मतदारसंघातील दहशत संपवा, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी केले.
ठाण्यात मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; राजन विचारे यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
सवलती बहाल केल्या आहेत का?
बरो परी पाचपाखाडाँ मतदारसंघात धनशक्ती जोरदार सुरू आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची मागणी केली आहे. तसेच मिंध्यांसाठी सगळ्या सवलती बहाल केल्या आहेत का? असा सवाल दिघे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.