देवेंद्र फडणवीसांकडून मिंधेंना आणखी एक धक्का! आनंदाचा शिधा बंद, योजनांना निधी न दिल्याने कात्री

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी काही योजना आणल्या होत्या. पण मुख्यमंत्रीपद जाताच या योजना बंद झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधेंच्या योजनांना निधी दिला नाही. त्यामुळे या योजना फक्त कागदोपत्री उरल्या आहेत.

गणेशोत्सव, शिवजयंती, गुढी पाडवा, दिवाळी दसऱ्यावेळी सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जातो. या योजनेसाठी राज्य सरकारने 602 कोटी रुपये खर्चही केले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कुठलाही निधी देण्यात आलेला नाही.

एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटनाची योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना धार्मिकस्थळी नेले जात होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधी न दिल्याने ही योजनाही बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे.

maharashtra budget 2025- महायुतीचं महापातक! गरीबांची थाळी पळवली; शिवभोजन योजना गुंडाळली

शिवभोजन थाळीही बंद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली होती. फक्त 10 रुपयांत गरीब आणि गरजूंना पोटभर अन्न मिळत होतं. नंतर कोरोना काळात ही थाळी मोफत करण्यात आली होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू होती. पण यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेलाही निधी देण्यात आलेला नाही.