दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 19 जानेवारीला दावोसच्या दौऱयावर रवाना होणार आहेत.
या दौऱ्यात डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिपंडक्टर, ईव्ही यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांत मोठय़ा संख्येने सामंजस्य करार होणार आहेत. या दौऱ्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे पी. अन्बलगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थपकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी सहभागी होतील. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते.