मुहुर्त सापडला… अखेर देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला गेले

मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर त्यांनी सपत्नीक वर्षा बंगल्यावर एक पूजा केली व त्यानंतर ते तेथे राहायला गेले.

साधारणत: मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जातात. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतरही ते उपमुख्यमंत्री असताना राहत असलेल्या सागर बंगल्यावरच राहत होते. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.