आता शुद्ध हवासुद्धा श्रीमंत लोकांचीच! 5 स्टार हॉटेलातील बोर्डची चर्चा

दिल्लीसह अनेक राज्यांत प्रदूषणाने पातळी ओलांडली आहे. प्रदूषित हवा मिळत असल्याने अनेक आजार उद्भवत आहेत, परंतु दिल्लीतील 5 स्टार हॉटेलमध्ये आता शुद्ध हवा मिळतेय, असे म्हणत याची सर्व्हिस सुरू केली आहे. अमेरिकेचे उद्योगपती ब्रायन जॉनसन यांनी एका पंचतारांकित हॉटेलमधील साईनबोर्डचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या साईनबोर्डावर लिहिले होते, आमच्या गेस्टरूमची सरासरी एअर क्वॉलिटी 2.4 आहे. प्रत्येक खोलीत स्मार्ट एअर फिल्टर लावले आहेत. या साईनबोर्डावर गंमत म्हणून ब्रायन यांनी लिहिले की, हॉटेल एक सेवेच्या रूपात स्वच्छ हवेची विक्री करत आहे. नवी दिल्लीतील आणखी एका पंचतारांकित हॉटेलमध्येही असा साईनबोर्ड पाहायला मिळाला.

 

हा बोर्ड अमेरिकेतील एका हिंदुस्थानी इंजिनीअरने शेअर केला आहे. या बोर्डावर लिहिले होते की, आमच्या गेस्टरूमचे एक्यूआय 58 आहे. जे त्या दिवशी शहरातील एक्यूआय 397 होते. या दोन्ही बोर्डांची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.