मासिक पाळी आल्याने विद्यार्थीनीला वर्गाबाहेर काढले, जमिनीवर बसून लिहायला लावला पेपर

मासिक पाळी आल्याने एका विद्यार्थीनीला तिच्या शिक्षकांनी वर्गाबाहेर काढले व तिला खाली बसून परिक्षेचा पेपर लिहायला लावला. हा धक्कदायक प्रकार घडलाय तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शाळेत. या मुलीला दोन दिवस सतत अशीच वागणूक मिळाल्याने तिसऱ्या दिवशी तिची आई शाळेत आली व त्यांनी स्वत: या घटनेचा व्हिडीओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.