
लग्नात बूट चोरल्यावरून वधू आणि वर पक्षात तुफान राडा झाला. ही घटना देहरादूनमधील गढमलपूर येथे घडली. वधूच्या नातेवाईकांनी वराच्या वडिलांना आणि वऱहाडीला घरात डांबून त्यांना मारहाण केल्याचा आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला. वराचे बूट वधूच्या मैत्रिणींनी चोरले. बूट परत करण्यासाठी 50 हजारांची मागणी केली होती. यावरून वधू-वर मंडळीत राडा झाला.