
बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांवरुन हाणामारी झाली. आरक्षण हा मुद्दा तिथेही चर्चेत आहे. आरक्षण या मुद्यावर झालेल्या या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून ढाका येथील जहांगीर नगर विद्यापीठाबाहेर विद्यार्थी एकमेकांना भिडले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की शेवटी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या आणि जमावाला पांगवावे लागले.
हाणामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले. सरकारच्या बाजूने असलेल्या विद्यार्थ्यांची संघटना आणि चळवळ करणाया विद्यार्थ्यांची संघटना असे विद्यार्थी जहांगीर नगर विद्यापीठाच्या बाहेर एकमेकांना भिडले. यामध्ये डझनभर विद्यार्थी जखमी झाले आहेत अशी माहिती बांगलादेश पोलिसांनी दिली.