
उत्तर प्रदेशात मेरठ आणि मुरादाबाद येथे ईदनिमित्त रस्त्यावर नमाज अदा करण्यावरून पोलीस आणि मुस्लीम नागरिकांमध्ये चकमक उडाली. अनेकांनी या वेळी पोलिसांवर दगडफेक केली तर काही जणांनी पॅलेस्टिनी झेंडे दाखवले तसेच काहींनी हातावर काळी पट्टीही बांधली होती.
लखनऊच्या एशबाग येखील दर्ग्यात ईदनिमित्त पोहोचलेल्या समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यापूर्वी ईदच्या दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर बॅरिकेडिंग कुठेही पाहिली नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी मला इथे येण्यापासून रोखल्याचा आणि दुसऱया धार्मिक उत्सवात सहभागी होता येऊ नये यासाठी ही हुकूमशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वक्फ विधेयक उद्या संसदेत
वक्फ सुधारणा विधेयक 2 एप्रिल रोजी संसदेत सादर होऊ शकते. सरकार सर्वात आधी लोकसभेत हे विधेयक सादर करेल. अधिवेशन 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, वक्फ विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी काळी पट्टी बांधून नमाज अदा करण्यात आली.