लोकसभेत राहुल गांधी आणि ओम बिर्ला यांच्यात खडाजंगी

लोकसभेत आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात खडाजंगी झाली. मला बोलू दिले गेले नाही, त्यामुळे लोकसभा लोकशाही मार्गाने चालवली जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मला बोलूच दिले नाही

सभागृहात विरोधी पक्षनेते जेव्हा उभे राहातात तेव्हा त्यांना बोलू दिले जाते ही परंपरा आहे. परंतु, मी जेव्हा बोलण्यासाठी उभा राहातो तेव्हा मला बोलूच दिले जात नाही. मला कळत नाही कशाप्रकारे सभागृहाचे कामकाज सुरू आहे, लोकसभा अध्यक्षांचे विचार नेमके काय आहेत, मी काहीच केले नाही. शांततेत बसलो होतो. गेल्या सात ते आठ दिवसात काहीच बोललो नाही. मी बोलण्यासाठी उभा राहिलो तेव्हा लोकसभा अध्यक्ष उठून गेले आणि सभागृहाचे कामकाज स्थगित झाले, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.