कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात

कुवेतमध्ये अमीर मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांचे नवे सरकार सत्तेवर आले आहे. नव्या सरकारने 42 हजार जणांचे नागरिकत्व रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा फटका लग्नानंतर कुवेतचे नागरिकत्व मिळाल्यांनाही बसला आहे. ज्या महिलांनी कुवेतीमधील पुरुषासोबत लग्न करून कुवेतचे नागरिकत्व मिळवले आहे. त्यांचे नागरिकत्व आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांना सरकारी योजना, आरोग्य सेवा, मुलांचे शिक्षण आणि इतर सामाजिक लाभ मिळणार नाही. कुवेतमध्ये गेल्या सहा महिन्यांत 42 हजार जणांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला.