Russia- रशियातील गूढ व्हायरसमुळे नागरिक भयभीत; तापासोबत खोकल्यातून रक्त पडत असल्यामुळे धास्ती वाढली!

रशियामध्ये सध्या अनेक नागरिक हे खोकल्याने त्रस्त आहेत. मुख्य म्हणजे या खोकल्याचे निदान होत नसल्यामुळे, डॉक्टरांना हा व्हायरस नेमका कोणता आहे हे ओळखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. रशियातील सरकारी अधिकारी एका गूढ व्हायरसमुळे सध्याच्या घडीला चिंतेत आहेत. या व्हायरसमुळे रशियातील नागरिक तापाने फणफणले असून, त्यांना प्रचंड खोकलाही आहे. हा खोकला केवळ साधा खोकला नसून, या खोकल्यामधून रक्तही पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरसमुळे संक्रमित नागरिकांमध्ये फ्लूसदृश्य लक्षणेही दिसून आली आहेत. अंगदुखी झाल्यानंतर इथल्या नागरिकांना प्रचंड भयावह खोकल्याला सामोरे जावे लागत आहे. खोकताना रक्त येत असल्यामुळेच, या व्हायरसबद्दल अनेकांना आता धास्ती वाटू लागली आहे.

 

मुख्य म्हणजे या व्हायरसवर कोणत्याही अँटीबायोटिक्सचा परिणाम होत नाही. त्यामुळेच उपचार नेमका काय आणि कोणता करायला हवा याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. च्या प्रयत्नांना आणखी गुंतागुंत होते. रुग्णांची संख्या वाढत असताना, डॉक्टरांना आता विषाणू ओळखण्यात अडचण येत आहे. या आजाराचे कोणतेही स्पष्ट कारण किंवा उपचार नसल्याने, डॉक्टरांकडून केवळ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लक्षणे गंभीर असल्यास आपत्कालीन सेवा दिल्या जात आहेत.

परंतु रशियातील सरकारी अधिकाऱ्यांकडून मात्र, व्हायरसच्या वृत्तांना फेटाळून लावले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणताही नवीन रोग आढळलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच रशियन आरोग्य अधिकारी हा आजार केवळ मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया अश्या पद्धतीचा असल्याचा दावा करत आहे. रशियात पसरलेल्या या व्हायरसमुळे सध्या जागतिक स्तरावरील आरोग्या संघटनासमोरही एक आव्हान उभे राहिले आहे.