सिडकोने मोठा गाजावाजा करत नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांची जाहिरात केली होती. पण या 26 हजार घरांसाठी अवघे 55 हजार अर्ज आले आहेत. या घरांसाठी एक लाख 36 हजार ग्राहकांनी फॉर्म भरले होते.
सिडकोने नवी मुंबईतील तळोजा खारघर, पनवेल आणि कंळबोलीतील घरांसाठी या जाहिरात काढली होती. या घरांसाठी 10 जानेवारी ही शेवटची तारीख होती. पण प्रत्येक घरामागे दोनच अर्ज आले आहेत. सिडकोने दिलेल्या माहितीनुसार या घरांसाठी सुरुवातीला 1 लाख 36 हजार अर्ज आले होते. पण फक्त 55 हजार ग्राहकांनी लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन फी भरली. सिडकोने ऐनवेळी घरांच्या किंमती जाहीर केल्या आणि त्या परवडणाऱ्या नसल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले.
परवडणारी घरं सांगून सिडकोने घरांच्या किंमती या अव्वाच्या सव्वा होत्या. आर्थिक मागास ग्राहकांसाठी 25 लाख ते 48 लाख घरांच्या किंमती होत्या. तर कमी उत्पन्न गटासाठी घरांच्या किंमती 34 लाख ते 97 लाख रुपये होत्या. याच किमतीत खासगी बिल्डर उत्तम घरं देतात आणि त्यांच्या घरांचा दर्जाही चांगला असतो असा आरोप ग्राहकांनी केला.
तळोजामध्ये 10 हजार 518 घरांची जाहिरात काढण्यात आली. पण या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. कारण या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असून पाण्याचीही वाणवा आहे. तसेच या घरांची किंमत 74 लाख रुपयांपेक्षा असून त्यावर 5 लाख रुपये रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी द्यावे लागणार आहेत.