CID- ‘कुछ तो गडबड हैं दया’ आता पुन्हा ऐकायला मिळणार का? कुठे जाणार एसीपी प्रद्युम्न!

सर्वात लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक असलेल्या सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न यांना कोण ओळखत नाही? हे एक असे पात्र आहे जे बऱ्याच काळापासून या शोचा प्राणवायु आहेत. अभिनेता शिवाजी साटम यांना एसीपीच्या भूमिकेत पाहणे ही सीआयडी शोची ओळख आहे. त्याच्या व्यक्तिरेखेशिवाय या शोची कल्पनाही आपण करु शकत नाही. या शोचा नवीन सीझन सध्या नेटफ्लिक्सवर सुरु होत आहे. पण आता सीआयडी आणि एसीपी प्रद्युम्नच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे.

शिवाजी साटम यांचे पात्र सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न लवकरच सीरीयलमध्ये मृत्यू पावणार आहे. असे म्हटले जाते की, त्यांचे पात्र मालिकेमधुन निरोप घेणार आहे. असे म्हटले जात आहे की, शिवाजी साटम शो सोडत आहेत, म्हणून त्यांच्या व्यक्तिरेखा संपवण्याची योजना चॅनलने केली आहे.

एसीपी प्रद्युम्नची हत्या कशी होणार?
तिग्मांशू धुलियाचे पात्र बारबुसा या मालिकेत एका भयानक दहशतवाद्याची भूमिका साकारत आहे, तो एका बॉम्बस्फोटाची योजना आखेल ज्यामध्ये सीआयडीचे उर्वरित सदस्य वाचतील, परंतु एसीपी प्रद्युम्न मात्र या बाॅम्बस्फोटात मरणार आहेत. हा भाग चित्रित झाला असून, काही दिवसांत तो प्रसारित होईल. चाहत्यांना धक्का बसावा अशी निर्मात्यांची इच्छा असल्याने अद्याप फारशी माहिती उघड झालेली नाही.

यापूर्वीही अनेक वेळा पात्रांना मारण्यात आले आहे.
या शोमध्ये सीआयडी पात्राचा मृत्यू दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक पात्रांना अशाच प्रकारे मारण्यात आले आहे, पण ते नंतर परत येतात. एसीपीचे पात्र शोमध्ये परत येईल की नाही हे चाहते या ट्रॅकला कसा प्रतिसाद देतात यावर अवलंबून असेल.