चर्चगेट परिसरातून चिमुरडीचे अपहरण

प्रातिनिधीक फोटो

चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृहाच्या मागच्या बाजूला पालकांसोबत झोपलेल्या एका एक वर्षाच्या बालिकेचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. एक महिलेने बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक वर्षाची चिमुकली तिच्या पालकांसोबत रात्री गाढ झोपली होती. हीच संधी साधत व त्या परिसरात वर्दळ नसल्याचे हेरून एका तरुण महिलेने त्या मुलीला उचलले आणि ती तेथून पसार झाली. पालकांना जाग आल्यावर मुलगी नसल्याचे त्यांना आढळले. त्यांनी आजूबाजूला मुलीचा शोध घेतला, परंतु मुलगी कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठून मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. अपहरणकर्ती महिला मुलीला घेऊन मुंबईच्या बाहेर पळून गेल्याचा संशय आहे.