![chris henry doll collection](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/chris-henry-doll-collection-696x447.jpg)
क्रिस हेनरी नावाच्या तरुणाला बाहुल्यांचे प्रचंड वेड आहे. मागील 10 वर्षांपासून तो बाहुल्यांचा संग्रह करतो. लाखो रुपये किमतीचा हा संग्रह आहे. क्रिस हेनरीने वयाच्या 16 व्या वर्षी पहिली विंटेज डॉल खरेदी केली. आज त्याच्याकडे 250 हून अधिक बाहुल्या आहेत. त्यांची किंमत अडीच ते साडेतीन लाख रुपये इतकी आहे.
सर्व बाहुल्या घरामध्ये एका कपाटात चांगल्या पद्धतीने त्याने मांडून ठेवल्या आहेत. त्या साधारणपणे 1990-95 च्या काळात मार्केटमध्ये आलेल्या बाहुल्या आहेत. त्यांची किंमत 4 ते 9 हजार रुपयांपर्यंत आहे. लोकांना वाटले त्यांच्याकडे भीतिदायक बाहुल्या आहेत. मात्र क्रिस म्हणतो, लोकांचा हा गैरसमज आहे. न्यूजर्सीच्या पॅरामस येथे राहणारा क्रिस आवडत्या डॉल्स खरेदी करण्यासाठी 20 हून अधिक देशांत फिरला आहे.