टीम इंडियाच्या स्वागतासाठी स्पेशल केक; खेळाडूंसाठी छोले-भटुरेसह खास मेजवाणीचं आयोजन

टी-20 वर्ल्डकप जिंकून टीम इंडिया गुरुवारी पहाटे मायदेशी परतली. बार्बाडोसहून विशेष विमानाने हिंदुस्थानचा संघ दिल्लीत दाखल झाला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले होते. तब्बल 17 वर्षानंतर हिंदुस्थानने टी-20 वर्ल्डकप जिंकल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण असून दिल्ली विमानतळावरही चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. चाहत्यांचे स्वागत स्वीकरत हिंदुस्थानचे खेळाडू दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलकडे रवाना झाले.

आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंचा शाही स्वागत करण्यात आले. यासाठी विशेष केकही बनवण्यात आला होता. वर्ल्डकप विजयाच्या थिमवर हा केक बवण्यात आला होता. यासाठी हॉटेलमधील स्टाफ गेल्या 24 तासांपासून मेहनत घेत होता. हिंदुस्थानी संघाच्या जर्सीसारखा हा केक बनवण्यात आला आहे.

याबाबत आयटीसी मौर्य हॉटेलचे शेफ शिवनीत पाहोजा यांनी सांगितले की, हा केक हिंदुस्थानी संघाच्या जर्सीच्या रंगात बनवण्यात आला आहे. या केकचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावर लावण्यात आलेली वर्ल्डकपची ट्रॉफी. ही ट्रॉफी खऱ्या ट्रॉफीसारखीच दिसत असून खास चॉकलेटपासून केक बनवण्यात आला आहे.

जगज्जेत्या खेळाडूंसाठी खास ब्रेकफास्टही तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. खेळाडू बऱ्याच काळानंतर मायदेशी परतले असून त्यांना खास ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. यात त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. छोले-भटुरे, मिलेट्ससह खास चॉकलेटचाही यात समावेश आहे. खेळाडूंचे आरोग्य आणि फिटनेस यावर परिणाम होणार अशा पदार्थांची रेलचेल मेजवाणीत असणार आहे.

रोहित, सूर्याचा डान्स

दरम्यान, दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर विश्वविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी ढोल-ताशांच्या गजरावर फेरा धरला. दोघांनीही तुफान डान्स केला. यावेळी त्यांचा फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)