चीनच्या सीमेवरील कुरघोडय़ा, घुसखोरी याबद्दल विरोधाचे शाब्दीक बुडबुडे सोडण्यासही कचरणाऱया पेंद्र सरकार आणि भाजपच्या कचखाऊ वृत्तीमुळे चीनने हिंदुस्थानातील स्थानिक छोटे व्यावसायिक आणि उत्पादकांनाही देशोधडीला लावले आहे. छत्र्या, खेळणी, विशिष्ट प्रकारचे कापड आणि संगीत वाद्ये यांसारख्या वस्तूंची चीनमधून होणारी वाढती आयात रोखण्यासाठी काहीही पावले न उचलणाऱ्या निष्क्रिय पेंद्र सरकारमुळे हीच उत्पादने बनवणाऱया स्थानिक लघु आणि मध्यम व्यावसायिक रस्त्यावर आले आहेत.
हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील आयात-निर्यात यातील तफावत प्रचंड असून हा एकूण व्यवहार हिंदुस्थानसाठी आतबट्टय़ाचाच ठरला असल्याचे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) या उद्योग क्षेत्राशी संबंधित थिंक टँकने म्हटले आहे