चीन बनवणार 10 लाख  ड्रोन; जगाची चिंता वाढली

चीनने 10 लाख एआय ड्रोन बनवण्याची ऑर्डर दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोन बनवत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. चीनच्या सेना पीपुल्स आर्मीने चीनमधील कंपनी पॉली टेक्नोलॉजीला ही ऑर्डर दिली आहे. चीनच्या या निर्णयामुळे शेजारचे राष्ट्र चिंताग्रस्त होऊ शकतात. चीनच्या ड्रोन्सचा वापर तायवान सारख्या क्षेत्रात हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे तज्ञांना वाटते. चीनसोबत रशिया सुद्धा ड्रोन मोठय़ा प्रमाणात तयार करत आहेत. रशिया मंत्रालयाच्या माहितीनुसार, रशिया दर महिन्याला 40 हजार ड्रोन तयार करत आहे. यासोबत एफपीव्ही ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध सिस्टमसाठी दरमहा 5 हजार यूनिटचे उत्पादन केले जात आहे. संरक्षणमंत्री आंद्रेई बेलौसोव यांनी ही माहिती दिली आहे. चीनचा धोका ओळखून अमेरिकेने सुद्धा ड्रोन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या ड्रोनला हेलस्केप नाव दिले आहे. भविष्यात होणाऱ्या युद्धात एआय ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, त्यामुळे चीन, रशिया, अमेरिका यासारखे पुढारलेले देश अत्याधुनीक ड्रोन बनवण्यासाठी पुढाकार घेत असून, त्यासाठी कोटय़वधी रुपये मोजत आहेत.