चीनची खोल समुद्रात उडी, समुद्रात ६५६० फूट खाली तयार होतंय स्पेस स्टेशन

चीन अंतराळात स्वतःचे स्थान भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर समुद्रातही जगाला चमत्कार दाखवण्याच्या तयारीत आहे. चीन दक्षिणेकडील समुद्रात डीप सी स्पेस स्टेशन बनवत आहे. समुद्रात दडलेला खजिना शोधणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

चीनचे डीप सी स्पेस स्टेशन समुद्रात दोन हजार मीटरच्या खाली असेल. त्यावर सहा शास्त्रज्ञ महिनाभर राहून काम करू शकतात. पाणबुडीसारखी या डीप सी स्पेस स्टेशनची रचना आहे. २०३० पासून डीप सी स्टेशन कार्यान्वित होईल. त्याचे वजन २५० टन, लांबी २२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि उंची ८ मीटर असेल. त्याला तियांगोंग म्हणजे स्वर्गातील महल असे नाव देण्यात आलंय. खोल समुद्रात संशोधन करणे, नैसर्गिक साधनांचा स्त्रोत शोधणे मोहिमेचा हेतू आहे.

डीप सी स्पेस सेंटरमधून खोल समुद्रात गरम आणि थंड पाण्यावर संशोधन केले जाईल. कारण या जागी मिथेनने परिपूर्ण हायड्रोथर्मल वेंट आहे. म्हणजेच ज्वलनशील बर्फाचे भांडार आहे. उर्जेचा हा मोठा स्त्रोत आहे. डीप सी सेंटरमधून भूकंपाच्या हालचालीवर संशोधन करता येईल. त्सुनामी संदर्भात आधी सूचना मिळू शकते.