एलन मस्क यांना चीनने जोरदार टक्कर मिळत आहे. चीनने स्टार लिंक हून जास्त वेगाने सॅटेलाइट इंटरनेट सर्विस आणल्याचा दावा केला आहे. चीनच्या दाव्यानुसार, सॅटेलाईटने जमीनवर 100 जीबीपीएसची इंटरनेट स्पीड मिळवली आहे.
साऊथ चायना मार्ंनग पोस्ट नुसार, कमर्शियल सॅटेलाईट कंपनी चांग गाँग सॅटेलाईट टेक्नोलॉजीने आपल्या जिलिन-1 सॅटेलाईटच्या मदतीने ट्रक माउंटेड ग्राउंड स्टेशनवर 100 जीबीपीएसचा वेग मिळवला आहे. हा वेग आधीच्या तुलनेत 10 पट जास्त आहे. याचा वेग किती आहे, हे समजून घ्यायचे असेल तर अवघ्या 1 सेकंदात 10 चित्रपट डाऊनलोड होतील, इतका वेग आहे. एलन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्विससाठी जवळपास 5500 हून जास्त सॅटेलाइट पाठवले आहे.