प्रियकराच्या भाच्याशी जुळले सूत, प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर प्रेयसीला 34 लाखांचा भुर्दंड

नातेसंबंधांवरील एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. चीनच्या शांघाई येथील न्यायालयातील एक प्रकरण चर्चेत आले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार प्रेमीयुगुलाचे नाव ली आणि सू आहे.या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

दोघांची  भेट 2018 साली झाली आणि लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2020 साली ली ला कळले की, त्याच्या प्रेयसी सू चे त्याच्या भाच्यासोबत संबंध होते. हे कळल्यानंतर ली ने नाते संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सू ला तिच्या चूकीची जाणीव झाली. तिने ली साठी माफीचे पत्र लिहीत आपल्या वर्तणूकीबाबत माफी मागितली आहे. त्यात तिने अनेकदा तुला फसविले आहे. तुला त्रास दिला आहे त्या चुका सुधारण्यासाठी तुला मोबदला देईन असे म्हटले आहे.

माफीच्या रुपात सू ने दोन दिवसात 3 लाख युआन म्हणजेच 34 लाख रुपये ली ला ट्रान्सफर केले. या घटनेनंतर त्यांचे नाते पुन्हा सुरु झाले मात्र 2022 मध्ये ली ला पुन्हा कळले की तिचे भाच्यासोबत अजूनही प्रेमसंबंध सुरु आहेत. त्यानंतर मात्र ली ने सू सोबतचे नाते पूर्णपणे संपवले. नाते तुटल्यानंतर सू ने तिचे 3 लाख युआन परत मागितले. तिने दावा केला की, ही रक्कम लग्नाच्या अटीवर दिली होती, मात्र लग्न न झाल्यामुळे तिला ते परत हवे. मात्र ली ने तिची ही मागणी नाकारली आणि  तिने ती रक्कम भावनात्मक नुकसान झाल्यामुळे दिली होती. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

न्यायालयाने यावर्षी याप्रकरणावर सुनावणी करताना निर्णय दिला की, ती रक्कम सू ने ली ला तिच्या स्वेच्छेने दिली होती. त्यामुळे ती परत करण्याची गरज नसल्याचा निर्णय दिला.