
चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. अतिरिक्त आयात शुल्कावरून दोन्ही देशांमध्ये चढाओढ सुरू असून चीनने आता युरोपियन महासंघाला साकडे घातले आहे. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणावरून चिनी जनतेमध्येही असंतोष असून ट्रम्प आणि मस्क यांच्यावरून अनेक मीम्स सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात येत आहेत. ट्रम आणि मस्क आजूबाजूला बसून बूट शिवतानाचे तर विविध प्रसिद्ध व्यक्ती कुणी आयफोन असेंबल करताना तर कुणी आणखी काहीतरी करताना दिसत आहेत. एआयच्या मदतीने अशा प्रकारची मीम्स एक्सवरून पसरवली जात असल्याचे समोर आले आहे.
हाँगकाँग येथील फिनिक्स टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडियोत ट्रम्प आणि एलन मस्क नीक या बूट बनवणाऱ्या अमेरिकेतील फॅक्ट्ररीत काम करताना दिसत आहेत. दोघेही बूट शिवताना दाखवण्यात आले आहेत. आणखी एका व्हिडिओत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस लाल टोपी आणि डेनिमचे शर्ट घालून आयफोन असेंबल करताना दाखवण्यात आले आहेत.
चीनचे परराष्ट्र मंत्रीही उतरले मैदानात
हा व्हिडियो सोशल मीडियावर केवळ चिनी नागरिकच नाही तर सरकारमधील बडी मंडळीही शेअर करताना दिसत आहेत. चीन सरकारी मीडिया आणि अधिकाऱ्यांनीही आपल्या एक्स हँडलवरून असे अनेक व्हिडिओ व्हायरल केले आहेत. चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माओ निंग यांनी एक्सवरून एक मीम पोस्ट केले आहे. यात ट्रम्प यांची स्वतःची मेक अमेरिका ग्रेट अगेन कॅपची किंमत अतिरिक्त आयात शुल्कामुळे 50 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर चीनच्या वाणिज्य दूतावासाचे प्रवत्ते लियू पेंग्यू यांनी एक मीम शेअर केले आहे. यात रेडनोट अॅपवर दाखवण्यात आले आहे की, मेक अमेरिका ग्रेट अगेन ही राजकीय घोषणा असून ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या घोषणेचा प्रामुख्याने वापर केला होता.