‘मेक इन इंडिया’चा टेंभा मिरवणाऱ्या पेंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. हिंदुस्थानात 2024 या वर्षात देसी कंपनीच्या तुलनेत चायनीज स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 2020 ते 2023 या वर्षात हिंदुस्थानात चायनीज स्मार्टफोनच्या विक्रीत घसरण पाहायला मिळाली होती, परंतु 2024 मध्ये पुन्हा एकदा चायनीज स्मार्टफोनची क्रेझ वाढली असून ग्राहक चायनीज स्मार्टफोन खरेदीला प्राधान्य देत आहेत. चायनीज स्मार्टफोनमध्ये शाओमी, रेडमी, विवो, सॅमसंग, टेक्नो, ओप्पो यासारखे फोन स्वस्त किमतीत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहक चायनीज कंपनीचे फोन खरेदी करत आहेत. विवो फोनला मार्पेटमध्ये चांगली डिमांड आहे.
स्वस्त फोनला डिमांड
देशभरात चायनीज कंपनीच्या स्वस्त फोनला डिमांड आहे. चायनीज कंपनीने विक्रीत मार्पेटमध्ये 15.8 टक्के भागीदारीवर कब्जा मिळवला आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. विवोचे फोन 10 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत मिळतात.
देशात 10 पैकी 7 आयफोन हे ईएमआयवर खरेदी
देशभरात आयफोन खरेदी करण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. श्रीमंत व्यक्तीसोबतच मध्यमवर्गीय व्यक्तीसुद्धा आयफोन खरेदी करत आहेत. आयफोनला फक्त फोन म्हणून खरेदी केले जात नसून आयफोन खरेदी करणे हे आता एक हायलेवलचे स्टेट्स बनले आहे. आयफोन असल्यास प्रतिष्ठा वाढते असा अनेकांचा गोड गैरसमज झाला आहे. आयफोनला ईएमआयवर खरेदी करणे सोपे झाल्याने आयफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे. हिंदुस्थानात 10 पैकी 7 आयफोन हे ईएमआयवर खरेदी करण्यात आले आहेत. हिंदुस्थानात आता 5जी स्मार्टफोनची चलती आहे. अनेक कंपन्या आपले 5जी फोन लाँच करत आहेत.