विक्रम मिसरी यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

देशाचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि ‘चीन तज्ज्ञ’ म्हणून ओळखले जाणारे विक्रम मिसरी यांची सरकारच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सोमवार पासून विक्रम यांनी हिंदुस्थानचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. विक्रम मिसरी हे हिंदुस्थानचे परराष्ट्र सेवेचे 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते.

विक्रम मिसरी यांनी यांनी परराष्ट्र मंत्रालय तसेच पंतप्रधान कार्यालयात विविध पदांवर काम केले आहे. याशिवाय मिसरी यांनी युरोप, आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील विविध भारतीय मिशनमध्येही काम केले आहे. तसेच त्यांनी स्पेनमध्ये (2014-2016) तर म्यानमार (2016-2018) आणि चीनमध्ये (2019-2021) या कालावधीत हिंदुस्थानचे राजदूत म्हणून काम केले आहे. जून 2020 मध्ये, लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक चकमकीदरम्यान, विक्रम मिसरी यांनी दोन्ही देशांमधील चर्चेत भाग घेतला होता.

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाते प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन विक्रम मिसरी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘श्री विक्रम मिसरी यांनी आज परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे . #TeamMEA परराष्ट्र सचिव मिसरी यांचे हार्दिक स्वागत करते आणि त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो’, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.