गलवान खोऱयासह पूर्व लडाखमधील चार ठिकाणांहून उभय देशांनी सैन्य माघारी घेतले असल्याचे चीनने शुक्रवारी अधोरेखित केले. उभय बाजूंच्या पश्चिम क्षेत्रातील सीमेवरील सैन्याने गलवानसह चार भागात सैन्यमाघार प्रत्यक्षात आणली आहे.
सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणाखाली आहे, असे चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्याने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे सीमाभागातील समस्या आणि संघर्षाचे मुद्दे निकालात काढण्यासाठी चर्चा केली होती. यानंतर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 75 टक्के सैन्यमाघारी पूर्ण झाल्याचे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही केले होते.