सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर 23 कोटींचे कर्ज फेडले

चीनमध्ये एका 31 वर्षीय तरुणाने आपल्या सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर कुटुंबावरचे 23 कोटींचे कर्ज अवघ्या सात वर्षांत फेडले. चेन झाओ असे या तरुणाचे नाव असून तो चीनच्या वुहान येथे वास्तव्यास आहे. चेनने कॅलिग्राफी स्कीलचे शिक्षण घेतले. कुटुंबाचा कपडय़ाचा धंदा होता. परंतु धंद्यात तोटा झाल्याने कुटुंबावर 20 मिलियन म्हणजेच जवळपास 23 कोटींचे कर्ज झाले होते. परंतु, चेन झाओने कॅलिग्राफी प्रशिक्षण स्टुडिओ ओपन केले. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि पैसे मिळत गेले. चेन सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत असे 13 तास काम करायचा.