बालविवाह कायदा सर्व धर्मांना लागू; केरळ हायकोर्ट

बालविवाह कायदा हा देशातील सर्व धर्मांना लागू आहे. वेगवेगळय़ा धर्मांसाठी वेगळा कायदा नाही. तो सर्वांसाठी सारखाच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला. कोणताही व्यक्ती प्रथम हिंदुस्थानचा नागरिक असला पाहिजे, त्यानंतर त्याचा धर्म येतो, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.